Thalapathy Vijay – तमिळनाडूच्या राजकारणात सुपरस्टार थलपती विजय यांनी सोमवारी अधिकृतपणे चेन्नईतील पेराम्बूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित भव्य रोड शोमध्ये त्यांनी सत्ताधारी डीएमके सरकारवर दुष्ट शक्ती म्हणून जोरदार टीका केली आणि आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपल्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या शिट्टी या चिन्हासमोर मतदान करून बदल घडवण्याचे आवाहन केले. Thalapathy Vijay उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खुल्या जीपमधून जनतेला संबोधित करताना विजय कमालीचे आक्रमक दिसले. ते म्हणाले की, तामिळनाडू सध्या अमली पदार्थांचा विळखा आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेमुळे धोक्यात आला आहे. या दुर्दशेला खुद्द मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांची दुष्ट-शक्ती कारणीभूत आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. Thalapathy Vijay Vijay २०२६ ची ही निवडणूक विजय यांच्यासाठी पहिलीच राजकीय कसोटी असून, त्यांनी पेराम्बूरसह मध्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली-पूर्व अशा दोन जागांवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विजय यांनी आपल्या भाषणात भावनिक साद घालत म्हटले की, मी माझे सुखवस्तू आयुष्य सोडून केवळ तुमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आलो आहे. मी कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही, असे ते म्हणाले. विजय यांनी डीएमके सरकारवर भ्रष्टाचार, विशेषतः टासमॅक (मद्य महामंडळ) आणि नगर प्रशासनात हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. तरुणांना उद्देशून ते म्हणाले की, ही निवडणूक म्हणजे एक शिट्टी क्रांती ठरायला हवी. ते पैसे नक्की घ्या…!!! Thalapathy Vijay निवडणुकीत हे लोक तुम्हाला पैसे वाटतील, ते पैसे नक्की घ्या कारण तो तुमचाच पैसा आहे. पण मतदान केंद्रावर गेल्यावर त्यांच्या कानाजवळ जोरात शिट्टी वाजवा आणि त्यांना सत्तेवरून हाकलून द्या, अशा शब्दांत त्यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी समर्थकांनी विजय यांना भगवान मुरुगन यांचे शस्त्र असलेले वेल भेट देऊन त्यांचे स्वागत केले. तामिळनाडूतील ही लढत आता स्टॅलिन विरुद्ध विजय अशी थेट रंगण्याची चिन्हे आहेत.