SMAT 2024 : आयपीएल 2025 पूर्वी रजत पाटीदार झाला कर्णधार, RCB ने केलं अभिनंदन….

Syed Mushtaq Ali Trophy 2024 : आयपीएल 2025 हळूहळू जवळ येत आहे. स्पर्धेपूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. पण त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळणारा रजत पाटीदार कर्णधार बनल्याची बातमी समोर आली आहे. आरसीबीने स्वतः सोशल मिडिया अकाउंटवरून पाटीदारचे कर्णधार झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
वास्तविक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 साठी रजत पाटीदारला मध्य प्रदेशचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रजत हा मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघाची कमान देण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 15 डिसेंबर रोजी होणार आहे.
Taking the helm for Madhya Pradesh, it’s Rajat Patidar’s time to shine in the Syed Mushtaq Ali Trophy! 🌟
Congrats, RaPa! Lead with prowess and let your gameplay do the talking on the field! 🔥#PlayBold #SMAT2024 pic.twitter.com/zQf6xNl9bH
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 20, 2024
आरसीबीने रजतला ठेवले कायम…
आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदारला RCB ने IPL 2025 साठी कायम ठेवले होते. रजतने 2024 हंगामात RCBसाठी 15 सामन्यांच्या 13 डावांमध्ये 30.38 च्या सरासरीने आणि 177.13 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 395 धावा केल्या, ज्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश होता. आरसीबीने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या तीन खेळाडूंनाच रिटेन केले आहे. गेल्या मोसमात संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसला फ्रँचायझीने सोडले आहे. अशा परिस्थितीत 2025 च्या मोसमात संघाची धुरा कोण घेणार हे पाहणे बाकी आहे.
Border-Gavaskar Trophy 2024/25 : पुजारा भारतीय संघात नसल्याचा आनंद : जोश हेझलवूड
पाटीदारची आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी कारकीर्द…
रजत पाटीदारने आतापर्यंत 3 कसोटी आणि 1 वनडे सामना खेळला आहे. त्याने कसोटीत 63 आणि एकदिवसीय सामन्यात 22 धावा केल्या आहेत. डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 66 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 113 डावांमध्ये पाटीदारने 43.32 च्या सरासरीने 4636 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 13 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 196 धावा होती.





