Sam Curran Ruled Out : राजस्थान रॉयल्सला सर्वात मोठा झटका! १८.५ कोटींचा स्टार अष्टपैलू खेळाडू IPL 2026 मधून बाहेर?
Sam Curran Ruled Out : आयपीएल २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा हादरा बसला आहे.

Sam Curran Ruled Out IPL 2026 Rajasthan Royals : आयपीएल २०२६ चा थरार सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा हादरा बसला आहे. इंग्लंडचा धाकड अष्टपैलू खेळाडू सॅम करन ‘ग्रोईन’च्या गंभीर दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता आहे. ५ मार्च रोजी टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत भारता विरुद्ध इंग्लंड सामन्यात तो शेवटचा मैदानात दिसला होता, त्यानंतर त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
ऐतिहासिक ‘ट्रेड’नंतर बसला फटका –
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक मोठा करार झाला होता. या ‘ट्रेड’ अंतर्गत कर्णधार संजू सॅमसन चेन्नईत गेला, तर त्याच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थानच्या ताफ्यात दाखल झाले होते. राजस्थानसाठी पहिल्यांदाच खेळण्यासाठी सज्ज असलेल्या करनच्या दुखापतीमुळे आता संघ व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
गेल्या हंगामातील सुमार कामगिरी –
🚨 REPORTS 🚨
Sam Curran is set to miss IPL 2026 due to a suspected groin injury. ❌
(Source: ESPN Cricinfo)#Cricket #IPL2026 #SamCurran pic.twitter.com/ojrbSjcRin
— Sportskeeda (@Sportskeeda) March 19, 2026
सॅम करनचा आयपीएल प्रवास पंजाब किंग्सपासून सुरू झाला होता. त्यानंतर त्याने चेन्नईसाठीही चमकदार कामगिरी केली. २०२३ मध्ये पंजाबने त्याला १८.५ कोटींची विक्रमी बोली लावून संघात घेतले होते. मात्र, २०२५ चा हंगाम त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. त्याने ५ सामन्यांत केवळ ११४ धावा केल्या आणि फक्त १ विकेट्स घेतली होती. यंदा राजस्थानकडून तो पुन्हा फॉर्मात येण्याची अपेक्षा होती, मात्र दुखापतीने घात केला आहे.
बदली खेळाडूचा शोध सुरू –
राजस्थान रॉयल्सने अद्याप अधिकृतपणे बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. तथापि, संघात रवींद्र जडेजासारखा अनुभवी अष्टपैलू आधीच मौजूद आहे. तसेच, डोनोवन फरेरा याच्या रूपाने संघाकडे एक आक्रमक फलंदाज आणि उपयुक्त फिरकीपटूचा पर्याय उपलब्ध आहे. आता राजस्थान सॅम करनच्या जागी कोणत्या परदेशी खेळाडूला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





