Rajasthan elections : वारं फिरलं! “डबल इंजिनला जनतेचे उत्तर”; राजस्थानमध्ये काँग्रेसची मोठी मुसंडी; भाजपला धक्का
Rajasthan elections : राजस्थान पंचायत निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मागे टाकले. राहुल गांधींनी विजयाचे स्वागत करत डबल इंजिन सरकारवर टीका केली. जाणून घ्या निकाल.

Rajasthan elections : राजस्थानमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. या विजयाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला. ‘भाजपच्या डबल इंजिन सरकारला त्यांच्याच राज्यातील जनतेने उत्तर दिले आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ग्रामीण भागातील जनतेने काँग्रेसवर दाखवलेला विश्वास ही आमची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले.
राहुल गांधींचा भाजपवर निशाणा –
राहुल गांधी यांनी राजस्थान काँग्रेसच्या विजयासंदर्भातील पोस्ट शेअर करत राज्यातील जनतेचे आभार मानले. भाजपने मनरेगा योजनेवर हल्ला केला, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आणि ग्रामपंचायतींचे अधिकार कमी केले, असा आरोप त्यांनी केला. महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती कठीण झाली आहे. ग्रामीण जनता हे सर्व पाहत होती. आता त्यांनी मतदानातून आपले मत व्यक्त केले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस भाजपपेक्षा पुढे –
२० नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये पंचायत समितीच्या ७ हजार ५४३ जागांपैकी ७ हजार ३९३ जागांचे निकाल जाहीर झाले होते. त्यापैकी काँग्रेसने ३ हजार ७०१ जागा जिंकल्या, तर भाजपला २ हजार १८१ जागांवर विजय मिळाला. जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसने ५९९ जागा जिंकत भाजपच्या ३०१ जागांपेक्षा आघाडी घेतली. पंचायत समितीच्या निवडणुकीत ३७ पैकी ३३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक जागा मिळवल्या.
राजस्थान के ग्रामीण भाइयों-बहनों का दिल से धन्यवाद। पंचायत चुनाव में आपने कांग्रेस पर जो भरोसा जताया है, वो अब हमारी ज़िम्मेदारी है।
ये जवाब BJP की अपनी सरकार वाले राज्य से आया है – सीधे “डबल इंजन” को।
BJP ने मनरेगा पर हमला किया, किसान को घाटे में डुबोया, पंचायतों के अधिकार छीने। महंगाई, बेरोज़गारी और पलायन ने गाँव सूने कर दिए।
गाँव सब देख रहा था, सह रहा था। अब उसने बोल दिया है।
ये सिर्फ़ राजस्थान का जनादेश नहीं – देश के हर गाँव की आवाज़ है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 20, 2026
पवन खेडा यांचाही मोदींना टोला –
काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनीही या निकालांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यांनी सुरुवातीच्या निकालांचा संदर्भ देत पंचायत समितीच्या ४ हजार ९५८ जागांपैकी काँग्रेसला २ हजार ४६३, तर भाजपला १ हजार ५१२ जागा मिळाल्याचे सांगितले. तसेच, आधीच्या तुलनेत भाजपची कामगिरी घसरल्याचा दावा केला. ‘मोदीजी, आता तुमचा गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे का?’ अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.
वरील २,४६३ आणि १,५१२ हे आकडे सुरुवातीच्या निकालांचे आहेत. २० नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत काँग्रेसच्या पंचायत समितीच्या जागा ३,७०१, तर भाजपच्या २,१८१ झाल्या होत्या. चार जिल्ह्यांतील मतमोजणी १७ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झालेले नव्हते.





