भीषण अपघात दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू

अजमेर – दोन मालवाहतूक ट्रकची समोरसमोर धडक बसल्यानंतर त्यामध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील परबतपुरा बायपास रोडवर झाला आहे.
Rajasthan | Four people killed as two vehicles caught fire after a collision at National Highway 8 in Ajmer: Sub Inspector of Adarsh Nagar, Kanhaiya Lal pic.twitter.com/OWuCd3F59G
— ANI (@ANI) August 17, 2021
या अपघाताची माहिती मिळताच आदर्श नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.





