Rajshri Deshpande : ‘सेक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्रीची कॅन्सरविरुद्धची लढाई ! रुटीन चेकअपसाठी गेली अन्..
अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाला असून त्यांनी अभियांत्रिकी आणि नंतर अभिनय प्रशिक्षण घेतले आहे.

Rajshri Deshpande – गाजलेल्या ‘Sacred Games’ या वेबसीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारून चर्चेत आलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी स्वतःला ग्रेड-1 ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Rajshri Deshpande)
रुटीन हेल्थ चेकअपदरम्यान त्यांना Infiltrating Ductal Carcinoma (NOS) प्रकारचा सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचे निदान झाले. वेळेत आजार सापडल्यामुळे तातडीने उपचार सुरू करण्यात आले आणि नुकतीच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. (Rajshri Deshpande)
राजश्री यांनी रुग्णालयातील फोटो शेअर करत सांगितले की, अनेक टेस्ट, उपचार आणि मानसिक चढउतारांचा हा कठीण प्रवास होता. मात्र कुटुंबीय आणि चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला.
View this post on Instagram
सध्या त्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच घरी परतणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी पुढे ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. (Rajshri Deshpande)
View this post on Instagram
राजश्री देशपांडे कोण आहेत? (Rajshri Deshpande)
अभिनेत्री राजश्री देशपांडे यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाला असून त्यांनी अभियांत्रिकी आणि नंतर अभिनय प्रशिक्षण घेतले आहे. दमदार आणि वास्तववादी अभिनयासाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत.
दरम्यान, अभिनयासोबत सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. राजश्री ग्रामीण विकास, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित अनेक उपक्रम राबवत असतात. नदी पुनरुज्जीवन आणि ग्रामीण शाळांसाठी काम करणे हे त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रमुख क्षेत्र आहे.
राजश्री देशपांडे यांनी मराठी, हिंदी तसेच आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये काम करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘Sacred Games’ मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीची प्रभावी भूमिका त्यांनी साकारली होती. राजश्री यांनी काही विदेशी चित्रपट आणि सामाजिक विषयांवरील डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे.





