गावरान राजाराणीची प्रेमकहाणी येणार मोठ्या पडद्यावर; उलघडणार अनेक रहस्ये

मुंबई : मराठी चित्रपटांना सुवर्ण दिवस आले आहेत. नागराज मंजुळेंचा सैराट चित्रपट सगळ्यांनीच पहिला असेल. त्यामध्ये आर्ची आणि परश्या यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळाली होती. यानंतर आता अजून एक अशीच हटके प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गावाकडील लव्हस्टोरी ‘राजराणी’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बरं ही प्रेमकहाणी नुसतीच प्रेमकहाणी नसून एक थरारक चित्र डोळ्यासमोर उभी करणारी आहे. येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
‘हे’ कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत
एका खेडेगावातील प्रेम कहाणीला समाजाकडून होणारा विरोध, कुटूंबाकडून मिळणारा नकार आणि यावेळी प्रेमीयुगुलांनी घेतलेला निर्णय याचे हुबेहूब वर्णन राजाराणी या चित्रपटातून लवकरच पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोडी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. याशिवाय भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे, सूरज चव्हाण हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम यांनी दिले आहे. तर पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे दिले आहे. आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.





