Raja Shivaji Movie Teaser : धमन्यांमधून रक्त खवळणार..! ‘धुरंधर 2’च्या सुरुवातीलाच झाली ‘राजा शिवाजी’ची एंट्री; घुमला ‘हर हर महादेव’चा नारा
Raja Shivaji Movie : रितेश देशमुखांचा महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Raja shivaji | Riteish deshmukh – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बहुप्रतिक्षित ठरलेला ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji Movie ) हा ऐतिहासिक चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला हा महत्त्वाकांक्षी सिनेमा १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी संपूर्ण देशभरात तब्बल ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटासाठी रितेश देशमुख यांनी घेतलेली मेहनत आता पडद्यावर दिसू लागली आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत या प्रवासाची आठवण सांगितली होती. Raja Shivaji Movie Teaser
दरम्यान, ‘धुरंधर २’च्या स्क्रिनिंगदरम्यान प्रेक्षकांना ‘राजा शिवाजी’चा भव्य ट्रेलर पाहायला मिळाला आणि सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सोशल मीडियावर हा टिझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Raja Shivaji Movie Teaser
चित्रपटाच्या टीझरमध्ये दमदार संवाद, युद्धनीती, स्वराज्याची संकल्पना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची भव्य मांडणी पाहायला मिळते. ऐतिहासिक भव्यता आणि सिनेमॅटिक स्केल यामुळे प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत. विशेष म्हणजे, टीझरमधून चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका देखील स्पष्ट झाल्या आहेत. Raja Shivaji Movie Teaser
View this post on Instagram
दिग्गज कलाकारांची मांदियाळी : Raja Shivaji Movie Teaser
‘राजा शिवाजी’मध्ये अनेक मोठे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार असून, त्यांची नावं खालील प्रमाणे….
रितेश देशमुख — छत्रपती शिवाजी महाराज
जिनिलीया देशमुख — सईबाई
महेश मांजरेकर — शहाजीराजे भोसले
भाग्यश्री — राजमाता जिजाऊ
अभिषेक बच्चन — संभाजीराजे शहाजीराजे भोसले
याशिवाय संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि विद्या बालन यांसारख्या कलाकारांचीही दमदार उपस्थिती आहे. जिनिलीयाचा मराठमोळा लूक आणि तिचे प्रभावी संवाद टीझरमध्ये विशेष लक्ष वेधून घेतात.
या सोबतच चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. टीझरच्या शेवटी ऐकू येणारं “छत्रपती” हे गीत प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणत असून, सिनेमाचं संगीतही मोठं आकर्षण ठरणार आहे. Raja Shivaji Movie Teaser
प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता : Raja Shivaji Movie Teaser
रितेश देशमुखांचा महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ऐतिहासिक भव्यता, दमदार कलाकार आणि प्रभावी संगीत यामुळे ‘राजा शिवाजी’ हा २०२६ मधील सर्वात मोठा ऐतिहासिक चित्रपट ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.





