“राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावाने पाटी कोरी”; केंद्रीय मंत्र्याचा खोचक टोला

Raj Thackeray | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यातच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष मुंबई मनपा निवडणुकीवर आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे या निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज बांधला जात आहे. यादरम्यान आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली. “राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी,” अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणांवर टोला लगावला.
राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी. नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत, आणि समस्या सुटत नाहीत. आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो, म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही,…
— Ramdas Athawale (@RamdasAthawale) January 1, 2026
रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हंटले की, “राज ठाकरेंची भाषणं ऐकायला भारी असतात, मात्र प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत त्यांची पाटी कोरी आहे. “आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना प्रत्यक्ष भेटतो, त्यांच्या सुख-दुःखात धावून जातो. त्यामुळेच मुंबईकरांच्या हृदयात आमचे स्थान अढळ आहे. केवळ गर्दी जमवून समस्या सुटत नाहीत,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले. Raj Thackeray |
तुम्ही कितीही युती करा, पण…
राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आठवले पुढे म्हणाले की, “राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही. ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्यांचे राजकारण आता संपत आले आहे. उद्धव ठाकरे यांना हे गणित कसे काय दिसत नाही. तुम्ही कितीही युती करा, पण आगामी निवडणुकीत मुंबईत तुमची विजयाची पणती पेटणार नाही,” अशी टोलेबाजी देखील आठवले यांनी आपल्या शैलीत ठाकरे बंधूंवर केली. Raj Thackeray |
हेही वाचा:
PMC Election: छाननीत ‘पास’ पण पक्षात ‘नापास’? एबी फॉर्मच्या घोळामुळे उमेदवारांचे धाबे दणाणले





