ओबीसी आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे केले स्वागत

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
याशिवाय, राज्यात रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्यासंदर्भात पावले उचलण्यासही कोर्टाने सांगितले आहे. दरम्यान, या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे, असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने स्वागत करतो, असेही ते म्हणाले.
OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले “आरक्षणासाठीची 99 टक्के लढाई…”






