Raj Thackeray – राज ठाकरेंचा अमित शहांना टोला,’टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं नवीन खात उघडलं…’

Raj Thackeray – मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जाहीर सभेला संबोधित भाजप सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि राम मंदिर निर्माण, कलम 370 हटवणे यासह राष्ट्रीय मुद्द्यांवर जनतेला संबोधित केले. तसेच राम अयोध्या मंदिराच्या नावावर पुन्हा एकदा लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगितले. अशात याच मुद्यावरू आज महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
ठाण्यात राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले,’अमित शहांनी आता टूर अँड ट्रॅव्हल्स अस नवीन खातं उघडलं असेल. कुणी काय काम केली यावर निवडणूक लढवा. राम मंदिरांचं आमिष कशाला दाखवता’ असा टोला ठाकरे यांनी लगावला.
राष्ट्रवादीवरही राज ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,’राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात इतर जातींचा द्वेष निर्माण करण्याचे काम सुरु झाले. त्यानंतरच दुसऱ्या जातींबाबत द्वेष निर्माण करणे सुरु झाले आहे. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. परंतु कोणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केले.’




