Raj Thackeray : युतीवर न बोलण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना, स्पष्टच सांगतील….

Raj Thackeray – सध्या इगतपुरी येथे मनसेचे शिबीर चालू आहे. या शिबिरात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी माध्यमांसमोर काय बोलायला हवे आणि काय नको याबाबतही त्यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत.
याबरोबरीने त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी मतदार यांद्यांवर बारीक काम करा, असा सल्ला देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी ठाकरे गटासोबतच्या युतीवरबाबतही पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत.
युतीबाबत काय निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईन. तुम्ही याबाबत माध्यमांशी काहीही बोलायचे नाही. युतीबाबत मी योग्य वेळी बोलेन असेही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना निक्षून सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या युतीबाबत मात्र राज ठाकरे यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





