Raj Thackeray: मनसेचा २०वा वर्धापनदिन आज रायगडाच्या पायथ्याशी होणार साजरा; राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केले महत्त्वाचे आवाहन
Raj Thackeray: वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून स्वतःपासून सदस्य नोंदणीचा शुभारंभ करणार

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज २० वा वर्धापनदिन आहे. विशेष म्हणजे यंदाचा वर्धापनदिन सोहळा हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून स्वतःपासून सदस्य नोंदणीचा शुभारंभ करणार आहेत. राज ठाकरे यांनी ट्विट करून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे.
राज ठाकरेंचे आवाहन (Raj Thackeray)
“माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र, आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन.
या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण ‘शिवराज्याभिषेकाचा’ साक्षीदार देखील हा किल्लाच. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत.
आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या. Raj Thackeray:
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत…
— Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2026
सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपातही (Raj Thackeray)
सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॉलेज, मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत !
येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत.
प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा. तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. Raj Thackeray
बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच. स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या,”असे म्हणत राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त होणाऱ्या भेटीबाबत देखील स्पष्ट केले आहे. Raj Thackeray
हेही वाचा:






