BMC Election : अखेर ठरलं! शिवसेना शिंदे गट ‘या’ बड्या नेत्याच्या नेतृत्वात लढणार मुंबई महापालिकेची निवडणूक

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुढच्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे. या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंड फडकणार? महायुती की महाविकास आघाडी? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना शिंदे गट ‘या’ बड्या नेत्याच्या नेतृत्वात लढणार
मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गट शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्व आणि नियोजनाखाली लढणार आहे. मुंबई महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व व नियोज असणार आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
‘मातोश्री’वर बैठक
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानं देखील मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मनसेसोबतच्या युतीबाबत विचारणा केल्याचे समजत आहे. यावेळी माजी नगरसेवकांनी मनसेसोबतच्या युतीसाठी अनुकूल मत व्यक्त केले आहे.





