Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे लवकरच पहिली यादी जाहीर करणार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 27 आणि 28 सप्टेंबर रोजी अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेणार आहेत.
राज ठाकरे विदर्भातून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरेंनी विधानसभेसाठी जाहीर केलेले 7 उमेदवार
1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर





