मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? जाणून घ्या कारण

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर सभा घेतली. यासभेदम्यान ठाकरे यांनी तलवार हातात घेऊन ती उंचावली दरम्यान याच कारणामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्यावर Arms Act अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील जाहीर सभेत तलवार उगारली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ठाकरे यांच्या भाषणाचीही तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाषणात आक्षेपार्ह आढळल्यास याप्रकरणीही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
उत्तरसभेआधी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलवार राज ठाकरे यांनी उंचावली. याआधी मोहित कंबोज, अस्लम शेख, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर Arms Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.





