Raj Thackeray : सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची देणगी चोरी; राज ठाकरे यांचा आरोप
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी १८ कोटी रुपयांच्या देणग्यांची अफरातफर केली जात होती, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे.

Raj Thackeray : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी १८ कोटी रुपयांच्या देणग्यांची अफरातफर केली जात होती, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला आहे. तसेच, अयोध्येतील राम मंदिरातही १,४०० कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
आजकाल मंदिरेही सुरक्षित राहिलेली नाहीत, असे म्हणत ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर भाष्य करावे, अशी मागणी केली. शनिवारी पक्षाच्या विद्यार्थी आघाडीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, निराश झालेले तरुण मंदिरांमध्ये जातात, परंतु मंदिरेही भ्रष्टाचारापासून सुरक्षित नाहीत. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले, असे सांगत ठाकरे यांनी आठ विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले.
ही चोरी उघडकीस येण्यापूर्वी मंदिराचे देणगीतून होणारे साप्ताहिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी होते आणि त्यानंतर हे संकलन १.५ कोटी रुपयांपर्यंत वाढले. दरवर्षी १८ कोटी रुपये चोरले जात होते, असा आरोप ठाकरे यांनी केला.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी सांगितले की, या प्रकरणी नऊ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आम्ही जिथे आवश्यक होते तिथे गुन्हे दाखल केले आहेत.
देणग्यांमधील वाढ ही ट्रस्टने केलेल्या प्रयत्नांमुळे झाली आहे. मंदिराचे उत्पन्न दोन वर्षांपूर्वीच्या ११४ कोटी रुपयांवरून १८२ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, असे त्यांनी (Raj Thackeray) पत्रकारांना सांगितले.






