‘भाजपचे यश हे एकट्या मोदींमुळे नाही तर महाराष्ट्रातील नेते…’ राज ठाकरेंनी सगळंच सांगितलं

Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहेत. नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याचा निमित्ताने राज ठाकरे, अमित ठाकरे तसेच मनसेची राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी 7 मार्च रोजी नाशिक शहरात दाखल झाले आहेत.
‘भाजप पक्षाचे यश हे … ‘राज ठाकरे म्हणाले
राज ठाकरे यांनी राजकीय पक्षाच्या एकंदरीत प्रवासाबाबत आणि यशाविषयी भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले,’इतर पक्षाचे यश तुम्हाला आता दिसतंय. आपल्याला वाटतं मोदींचं जे यश आहे, २०१४ साली आलेलं. ते पूर्ण यश मोदीं याचं आहे का?. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, त्यातील काही भाग मोदींचा असेल. पण त्याचं संपूर्ण श्रेय इतकी वर्षापासून त्यांचे जे कार्यकर्ते झटत आहे, त्यांचं आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘१९५२ साली त्यांचा जनसंघ पक्ष स्थापन झाला. १९८० साली त्यांचं भाजप असं नामकरण झालं. १९५२ सालापासून अनेकांनी खस्ता खाल्ल्या. मोदी, महाराष्ट्रातील नेते मुंडे आणि वहाडणे, हशू आडवाणी. इतक्या लोकांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्यातून हे यश आलं आहे. अचानक आलं नाही. गेली १८ वर्ष मी अनेक चढउतार पहिले. चढ पेक्षा उतार जास्त पाहिले. यावेळी तुम्ही सर्व बरोबर राहिला. तुम्हाला मी यश मिळून देणार आहे. सत्ता मिळवून देणार आहे. परंतु त्यासाठी स्पेशन महत्वाचे आहे.’ असेही ते म्हणाले आहे.
हेही वाचा
जुनं तेच सोनं ! जुन्या चपला आणि बुटांपासून दोन तरुणांनी उभारला ३ ‘कोटींचा व्यवसाय’





