डंके की चोट पर.! “राज ठाकरे माफी मागा अन्यथा…”; सदावर्ते आणि राज ठाकरेंमध्ये पुन्हा जुंपली

Gunaratna Sadavarte | Raj Thackeray | Maha Kumbh Mela 2025 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभमेळा आणि गंगा नंदीच्या पाण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. गंगा नदीचे पाणी कोण पिणार? असा सवाल करत राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील गंगा स्नानाची खिल्ली उडवली होती. यावरून आता अनेकांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
काल (9 मार्च) मनसेच्या 19व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाळा नांदगावकर यांनी छोट्याशा कमंडलूमध्ये गंगेचे पाणी आणले होते. त्यावर मी हड्ड.. हे पाणी पिणार नाही, असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सदावर्ते म्हणाले, “मला वाटतं राज ठाकरेंना आता स्पष्ट करावं लागेल की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी आहे की नाही? त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना जाऊन विचारलं पाहिजे, राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय आहे? राज ठाकरे यांना भारतीय संविधानाने दिलेला श्रद्धेचा मूळ अधिकार समजत नसेल.
गंगा हा विषय लोकांच्या श्रद्धेसोबत जोडला गेला आहे. राज ठाकरे यांनी गंगा मातेचा अपमान केला आहे. राज ठाकरेंची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. ते जेव्हा बोलत होते तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. राज ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचा पक्ष हिंदुत्ववादी नाही, असं हल्लाबोल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
तुमच्या औलादी म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना मनसेचा दणका !
वाचा सविस्तर बातमी…..
Raj Thackeray : तुमच्या औलादी म्हणणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना मनसेचा दणका, काय घडलं पाहाच….





