राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; दोन्ही भावांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Raj Thackeray And Uddhav Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एका कार्यक्रमानिमित्त एकत्र पाहायला मिळाले. सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीचे सध्या सोशल मीडियावर तुफान फोटो व्हायरल होत आहे. यात तिघेही गप्पा, हास्य विनोदात रमल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे ठाकरे बंधूंची ही तीन महिन्यात तिसरी भेट आहे. महायुती आणि महाविकास आघाडी युतीमध्ये फूट पडण्याच्या दावे होत असताना, ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या बैठकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे आणि मुंबईतील शिवसेना भवनात ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे आवाहन करणारे बॅनर लावण्यात आले होते, ज्यामुळे ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे. Raj Thackeray And Uddhav Thackeray |
गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा भेट
15 डिसेंबर 2024 – मुंबईतील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी लावली होती.
22 डिसेंबर 2024 – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात हे लग्न लागले.
23 फेब्रुवारी 2025 – शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात अंधेरी येथे भेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट झाली.
हेही वाचा:
‘मी गंगेत स्नान केले आहे, आता गंगा कशी धुवणार?’, अखिलेश यादव यांचा ‘त्या’ घटनेवरून भाजपला खोचक सवाल





