Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना ठाणे रेल्वे न्यायालयात हजर राहणार आहेत. रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान ऑक्टोबर २००८मध्ये कल्याण स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात उमेदवारांना मारहाण करण्यात आली, तसेच रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. मनसे कार्यकर्त्यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप करत उत्तर भारतीयांना लक्ष्य केले होते. या खटल्याच्या सुनावणीसाठी येत्या गुरुवारी राज ठाकरे हे ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. राज ठाकरेंनी या मुद्द्यावर भाष्य करत हिंसाचाराला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिल्याचा आरोप प्रकरणात करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज ठाकरेंना आणि त्यांच्या सात सहकारी मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. मात्र, नंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. आज पुन्हा सुनावणी होणार सुरुवातीला हे प्रकरण कल्याण न्यायालयात चालले, पण नंतर ते ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आले. सुनावणीच्या दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने न्यायालयाने राज ठाकरेंना आणि इतर आरोपींना समन्स बजावली. यानंतर अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. Raj Thackeray | राज ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून हे अटक वॉरंट रद्द करण्यात यश मिळवले. मात्र, प्रकरण अद्याप प्रलंबित आहे आणि आज पुन्हा सुनावणी होणार आहे. राज ठाकरेंनी स्वतः न्यायालयात हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या न्यायालयातील उपस्थितीमुळे ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात येणार आहे. Raj Thackeray | हेही वाचा: Pune District : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंत नवीन रस्ता निर्मितीस मान्यता