Raisoni Gas Leak : रायसोनी गॅस गळती प्रकरणाची चौकशी सुरू; फायर ब्रिगेड ची हाताची घडी तोंडावर बोट?
वाघोली तालुका हवेली येथील रायसोनी महाविद्यालयाच्या (Raisoni Gas Leak) मुलींच्या वस्तीगृहातील कॅन्टीन मध्ये मंगळवारी दि. 21 जुलै च्या मध्यरात्री गॅस गळतीचा प्रकार घडला होता. सुदैवाने आग लागली नाही मात्र जवळपास 170 मुलींचा जीव या प्रकरणात वाचला होता.

Raisoni Gas Leak : वाघोली तालुका हवेली येथील रायसोनी महाविद्यालयाच्या (Raisoni Gas Leak) मुलींच्या वस्तीगृहातील कॅन्टीन मध्ये मंगळवारी दि. 21 जुलै च्या मध्यरात्री गॅस गळतीचा प्रकार घडला होता. सुदैवाने आग लागली नाही मात्र जवळपास 170 मुलींचा जीव या प्रकरणात वाचला होता.
याप्रकरणी वाघोली येथील स्वप्निल मगर, मिनार अरुण जगताप या युवकांनी वाघोली पोलीस ठाण्याकडे या संदर्भात महाविद्यालयावर अग्नि सुरक्षा आणि निष्काळजीपणा या संदर्भात कारवाई करण्याची मागणी दि. 30 जुलै रोजी केली होती. त्यानुसार वाघोली पोलीस ठाण्यात पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून या प्रकरणात जाबजबाब घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणात अग्निशामक दलाला स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी (Raisoni Gas Leak) कळवले होते. अग्निशामक दलाचे प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट देऊन अग्निशामक यंत्रणा कार्यन्वित नसल्याचा खुलासा वरिष्ठांकडे केला होता. त्याच्यावर देखील अग्निशामक दलाकडून कारवाईची अपेक्षा होती मात्र अग्निशामक दलाच्या एका अधिकाऱ्याकडून जाणीवपूर्वक गंभीर प्रकरणात टोलवाटोलवी सुरू आहे.
संबंधित अग्नी सुरक्षा संदर्भात एवढा गैरप्रकार घडून देखील अग्निशामक दलाच्या प्रतिनिधींनी भेट देऊन देखील अग्निशामक दलाकडून संबंधित रायसोनीला कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागले नाही यामुळे अग्निशामक दलाच्या अत्यावश्यक सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
त्रुटींची माहिती असून देखील कारवाई न करणारे अधिकाऱ्यावर अग्निशामक दल अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत तातडीने कारवाई व्हावी यासाठी कारवाई परिसरातील लोकप्रतिनिधी (Raisoni Gas Leak) यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. अग्निसुरक्षा अधिकारी पोटफोडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
रायसोनी महाविद्यालयाच्या मुलींच्या वस्तीगृहामध्ये गॅस गळतीचा प्रकार घडल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत तातडीने कारवाई होणे अपेक्षित होते. वाघोली पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. मात्र अग्निशामक दलाकडून टोलवाटोलवी केली जात असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
मिनार जगताप
ग्रामस्थ, वाघोलीलोकप्रतिनिधींनी कळवल्यानंतर अग्निशामक दलाचे दत्तात्रय सातव यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली आहे. या पाहणीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. तरी देखील मी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहे. अग्नि सुरक्षा संदर्भात ज्या त्रुटी आढळून येतील त्या संदर्भात संबंधिताला कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार आहे.
प्रमोद सोनवणे
अग्निशामक दल अधिकारी, खराडीरायसोनी महाविद्यालयाच्या वसतिगृह बाबत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला असून त्याची चौकशी सुरू असून चौकशी नंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नंदकुमार गायकवाड
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली






