Pimpri : घरोघरी जाऊन आजारांविषयी जनजागृती

कान्हे : कुसगाव, येवलेवाडी, कामशेत, या ठिकाणी कीटकजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया , चिकनगुणिया, तसेच जलजन्य आजार, अतिसार, याबद्दल जनजागृती करण्यात आली.
यावेळी नागरिकांना डेंगू मलेरिया चिकनगुनिया या आजारापासून सुरक्षित कसे राहायचे, परिसरात स्वच्छता कशी ठेवायची ? याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सह आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. तसेच आपल्या परिसरातील डबक्यांमध्ये किंवा टायर नारळाचे कवठे यामध्ये होणारा पाणीसाठा जास्त दिवस न ठेवता वेळेतच रिकामा करावा.
जेणेकरून त्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही व यासारखे आजारांचे प्रमाण कमी प्रमाणात होईल यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. भंगार साहित्य दुकान पासुन प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाययोजना म्हणुन कंटेनर सर्वेक्षण, धूरफवारणी, करण्यात आली.
यावेळी कुसगाव गावच्या विद्यमान सरपंच, वैद्यकीय अधिकारी डॉ, शुभांगी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पर्यवेक्षक ठोंबरे, आरोग्य सहायक शेडगे, कोकरे, साळुंखे, विकास कापसे, तसेच एम पी डब्लू, आशा सहायक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मेडिकलर वाटप केले.
नागरिकांना आजारांच्या लक्षणांची, आजार होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. यात प्रामुख्याने आपल्या परिसरात टायर, नारळाचे कवटी किंवा प्लॅस्टिकच्या डब्ब्यांमध्ये आणि ड्रमात पाणी साचू देऊ नये. घरात साठा केला असल्यास झाकून ठेवावा डास होऊ देऊ नये. नियमितपणे घरातील पाण्याची भांडी रिकामी करुन पुसून भरावीत. अशी माहिती दिली.
आपल्या परिसरात वेगवेगळ्या वस्तुंमध्ये पाणीसाठा होऊ न देणे. नियमितपणे पाणीसाठा रिकामा करावा जेणेकरून डास उत्पत्ती होणार नाही. कामशेत तसेच कामशेत परिसरातील गावोगावी जाऊन या संदर्भात आमची जनजागृती चालू आहे.
– शुभांगी बहिरट, आरोग्य अधिकारी, कामशेत





