घन आज बरसे…! पूजा सावंतचे पावसात भिजत फोटोशूट

Pooja Sawant | अभिनेत्री पूजा सावंतला ‘दगडी चाळ’ या सिनेमामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. मराठीसह तिने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील पूजा सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने इनस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. पूजा सावंतचे हे फोटोशूट विशेष चर्चेत आले आहे.
पूजाने हे फोटोशूट पावसामध्ये केले आहे. लेटेस्ट फोटोशूटसाठी तिने साडीला पसंती दिली आहे. तिने या फोटो सीरिजसाठी ‘वर्षाऋतू’ असे कॅप्शनही दिले. निळ्या रंगाच्या सुती साडीवर तिने हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. साडीमध्ये पूजा फिगर फ्लाँट करताना दिसली. या फोटोमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
पूजाने या साडी लूकसाठी ऑक्सिडाइज्ड कानातले परिधान केलेत. या सिंपल लुकमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. अभिनेत्रीने हे फोटोशूट एका इमारतीच्या गच्चीवर केल्याचे दिसत आहे. पावसात भिजायचा मनसोक्त आनंदही तिने लुटला. तिच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पूजाने नुकतंच सिद्धेश चव्हाणशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. Pooja Sawant |
पूजाने यापूर्वी ‘जंगली’ चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये काम केलं होतं. यामध्ये तिला अभिनेता विद्युत जामवालबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. याशिवाय पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने उत्तम भूमिका साकारली आहे. नुकतीच ती ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली आहे. Pooja Sawant |





