आंबोली घाटात दरड कोसळली
Updated On:

कोल्हापूर – आंबोली येथील घाटात दरड कोसळली आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली येथील घाटात दरड कोसळली . ही घटना पूर्वीचा वस देवस्थानपासून खाली दोनशे मीटरवर घडली. दरडीचा काही भाग रस्त्यावर कोसळल्याने घाटात एकेरी वाहतूक सुरु आहे.





