Rain Alert Maharashtra : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट
Rain Alert Maharashtra : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 1 ते 5 ऑगस्टपर्यंत कोणत्या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट आहे, जाणून घ्या संपूर्ण हवामान अंदाज.

Rain Alert Maharashtra : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून, काही भागांत मुसळधार पाऊस सुरू असताना काही जिल्ह्यांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.
मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1 ऑगस्ट : घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा –
1 ऑगस्ट रोजी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर नंदुरबार, नाशिक घाट परिसर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
2 ऑगस्ट : कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता –
2 ऑगस्ट रोजी रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3 ऑगस्ट : सहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम –
3 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
4 ऑगस्ट : विदर्भात मेघगर्जना आणि विजांचा इशारा –
4 ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
5 ऑगस्ट : विदर्भातील सात जिल्ह्यांना यलो अलर्ट –
5 ऑगस्ट रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन –
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या काळात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खराब हवामानाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे सांगण्यात आले आहे.
विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांच्या परिसरात तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तातडीने स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.





