Railway Recruitment : रेल्वेमध्ये ‘या’ कोट्याअंतर्गत भरती ‘जाणून घ्या’ कसा करायचा अर्ज

Railway Job : रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाईड कोट्याअंतर्गत लेव्हल 1 आणि लेव्हल 2 पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती दक्षिण रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहे. दक्षिण रेल्वेने स्काऊट आणि गाईड कोट्याअंतर्गत १७ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार rrcmas.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
दक्षिण रेल्वेने स्काऊट गाईड कोट्याअंतर्गत 17 पदांसाठी 20 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
किती जांगांवर होणार भरती ?
दक्षिण रेल्वे : १४ पदे
ICF : 3 पदे
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू घ्यावी.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेतील 40 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. स्काउट्स आणि गाईड्स संस्था आणि त्याच्या क्रिया कलापांशी संबंधित 1 निबंध प्रकारचा प्रश्न तसेच स्तर 2 आणि स्तर 1 साठी सामान्य ज्ञान यांचा समावेश आहे.
अर्ज फी
सर्व उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. जे लोक अधिसूचनेनुसार पात्र ठरले आहेत आणि प्रत्यक्षात लेखी चाचणी/संगणक-आधारित चाचणीत बसले आहेत त्यांना बँक शुल्क वजा केल्यावर रु.400 परत केले जातील. अनुसूचित जाती/जमाती आणि इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे.





