रेहान-अविवाच्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर ; रॉबर्ट वाड्रा,”मुलाला जीवनसाथी…”

Raihan Aviva Engagement । काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचे पुत्र रेहान वाड्रा यांनी २९ डिसेंबर रोजी अवीवा बेगशी लग्न केले. लग्नानंतर रेहान वाड्रा यांनी अवीवा बेगसोबतचा त्यांचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या होत्या, पण आता रेहानच्या पोस्टने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
“माझ्या मुलाला जीवनसाथी मिळाली” Raihan Aviva Engagement ।
रेहान वाड्रा यांचे वडील रॉबर्ट वाड्रा यांनी, “माझ्या मुलाला त्याची जीवनसाथी मिळाली आहे. माझ्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत. त्याला जीवनात आनंद मिळो. त्यांचे जीवन आनंदाने, अढळ सहवासाने, प्रेमाने आणि शक्तीने भरलेले राहो. जीवनाच्या या प्रवासात ते एकमेकांचे हात धरत राहोत, एकत्र प्रगती करत राहोत आणि यश मिळवत राहोत.” असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
प्रियंका गांधी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत, “तुम्ही तीन वर्षांच्या असल्यापासूनचे सर्वोत्तम मित्र आहेत त्यामुळे तुम्ही नेहमीच एकमेकांचा आदर करा आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप प्रेम” असे त्यांनी म्हटले आहे.
रेहानने केले अविवाला प्रपोज Raihan Aviva Engagement ।
अविवा बेग आणि रेहान दोघांनाही फोटोग्राफीमध्ये खूप रस आहे. नुकतेच रेहानने अविवाला प्रपोज केले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न ठरले. रेहान वाड्रा आणि अविवा बेग सवाई माधोपूरमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात एकत्र फिरताना दिसले. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील त्यांच्यासोबत होते.
रेहान वाड्रा आणि अविवाचे कुटुंब देखील खूप जवळचे आहेत. रेहान वाड्रा यांनी देहरादूनमधील प्रसिद्ध दून स्कूलमध्ये शिक्षण घेतले, त्याच शाळेत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही शिक्षण घेतले होते. त्यानंतर रेहान पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले होते.





