Pravin Darekar : रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला; भाजपचेही तीन आमदार आहेत हे विसरू नका: प्रविण दरेकरांचे सूचक विधान

रायगडः रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात वाद सुरू आहे. दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या जात आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विकोपाला गेल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. अद्यापही हा वाद थांबयचे नाव घेत नाहीये, अशातच आता पालकमंत्री पदाच्या वादात भाजपने उड्डी घेतली आहे. भाजपचे नेते विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि अजित पवार गटातील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचेही तीन आमदार आहेत, हे विसरू नका, असे सूचक विधान दरेकर यांनी केले आहे. मंगळवारी माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
जनतेने महाविकास आघाडीला नाकारून महायुतीवर विश्वास टाकला आहे. महायुतीच्या सर्वच आमदार, मंत्र्यांनी या विश्वासाला शोभेल, असे वागण्याचा सल्ला दरेकर यांनी दिला. तसेच पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर वादविवाद होणे हे महायुतीला शोभा देणारे नाही. पालकमंत्री पद म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न नाही, असे देखील ते म्हणाले. भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. मीसुद्धा मंत्रीमंडळात असायला हवे होते, परंतु पक्षनेतृत्वाच्या पुढे गेलो नाही. सहकारी पक्षाने आपापल्या नेतृत्वाकडे भूमिका मांडावी, असा सल्ला दरेकर यांनी दिला आहे.
…आता पालकमंत्री पदाचा वाद शिगेला
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने सुनील तटकरे यांचे प्रामानिकपणे काम केले. मात्र, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली नसल्याचा आरोप केला जात आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री भरत गोगावले यांना मिळले अशी अपेक्षा त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, जिल्ह्याचे पद मंत्री आदिती तटकरे यांनी देण्यात आले. यानंतर काही दिवसातच या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. यावर कायदा आणि सुवस्था बिघडणार नाही ही सर्वांची जबाबदारी असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. यामुळे अद्यापही पालकमंत्री पदाचा वाद मिटला नसून तो आता शिगेला पोहचला आहे. या वादात भाजपचे प्रवीण दरेकर यांनी जरी उड्डी घेतली असली तरी पक्षनेतृत्व काय करणार हे पाहवे लागणार आहे.





