हॉटेलातील वेश्या व्यवसायावर छापा; 23 जणांना अटक, प्रकरणात ढिलाई केल्याबद्दल 6 पोलिस कर्माचारी निलंबीत
Updated On:

नॉयडा, दि. 20 – ग्रेटर नॉयडातील एका हॉटेलात चालणाऱ्या वेश्या व्यवसाय प्रकरणात पोलिसांनी छापा घालून तेथे 12 महिलांसह एकूण 23 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात ढिलाई केल्याबद्दल सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
या प्रकरणात स्थानिक पोलिसांशी संगनमत असल्याचा दावा केला जात असून त्या अनुषंगानेही सध्या चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्या हॉटेलावर छापा घालण्यात आला ते हॉटेल दानकपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. ग्रेटर नॉयडाच्या सहायक पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
यात 12 महिला 11 पुरूष व हॉटेल व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात जे सहा पोलिस कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत त्यात चार पोलिस कॉन्स्टेबल, एक हेड कॉन्स्टेबल आणि एका पोलीस चालकाचा समावेश आहे.





