गुटखा व्यापाऱ्याच्या घरावर धाड; पैसे मोजणी करण्यासाठी आणाव्या लागल्या ३ मशीन
Updated On:

लखनौ – उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये केंद्रीय वस्तू सेवा कर पथकाने गुटखा व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 6 कोटी 31 लाख 11 हजार आठशे रुपयांची रोकड जप्त केली आहे. हे पैसे गुटखा व्यापाऱ्याने आपल्या बेडमध्ये लपवून ठेवले होते.
पैशांची मोजणी करण्यासाठी स्टेट बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना तीन मशिन आणि मोठ्या ट्रंक आणाव्या लागल्या. तब्बल 18 तासांनंतर ट्रंकमध्ये भरून रक्कम नेण्यात आली.
जगत गुप्ता हे त्या व्यापाऱ्याचे नाव असून 15 सदस्यीय पथकाने 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता सुरू केलेला हा छापा 13 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत सुरू होता. रात्री उशिरापर्यंत तीन मोठ्या ट्रंक पैशांनी भरल्या होत्या.
टॅग्स:





