अजय देवगणच्या ‘रेड 2’ची रिलीज डेट जाहीर; ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Raid 2 movie released Date | अभिनेता अजय देवगणच्या ‘रेड’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘रेड 2’ला मुहुर्त मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटाच्या रिलीज डेटवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
‘रेड 2’ हा सिनेमा आता १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
याआधी हा सिनेमा १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण, ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्याने ”रेड 2′ च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये सिनेमा रिलीज होणार असल्याचे म्हंटले जात होते. मात्र त्यातही बदल करण्यात आला. अखेर आता ”रेड 2’ची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. Raid 2 movie released Date |
दरम्यान, २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. आता ‘रेड 2’साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केले आहे. Raid 2 movie released Date |
हेही वाचा:





