Prajakt Tanpure : “कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्याल्यानंतर…”; राहुरी पोटनिवडणुकीबाबत प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया
Prajakt Tanpure : राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. महायुतीमधील भाजपकडे ही जागा असल्याने पक्षाकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Prajakt Tanpure: देशभरातील विविध राज्यांतील ८ विधानसभा रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.
राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. महायुतीमधील भाजपकडे ही जागा असल्याने पक्षाकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून विचार केला जात आहे. या पोटनिवडणुकीवर प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Prajakt Tanpure
राहुरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय लवकरच जाहीर करू, असे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. निवडणूक लढवण्याचा निर्णय ठाम असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीबाबत बोलताना म्हटलं की, “मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे कार्य कुणी डावलू शकत नाही. पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू.” Prajakt Tanpure
Pune Crime : पुणे हादरलं! ‘१० मिनिटांत मुलाला घेऊन जा, नाहीतर…’, आईला आला तो खळबळजनक फोन
मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक Prajakt Tanpure
याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे, असेही तनपुरे म्हणाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र जर निवडणूक लादली गेली, तर आम्हीही ती लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026
हेही वाचा:






