Rahul Narwekar : विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार की नसणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. यानंतर त्यांनी सरकारदेखील स्थापन केले. यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीदेखील पार पडला. तसेच विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड करण्यात आली. यानंतर आता विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार की नसणार? यावर राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राहुल नार्वेकर?
नियमात जे असेल त्यानुसार संधी दिली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, जनतेच्या कोर्टात मी गेलो, मला 50 हजारांचं लीड मिळालं, ज्यामुळे जे टीका करतता त्यांच्याकडे मी लक्ष देणार नाही, असे नार्वेकर म्हणाले. तसेच आज माझी बिनविरोध निवड झालेली आहे, राज्यातील 13 कोटी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या लोक प्रतिनिधींना मी बोलण्याची संधी देईन.
जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी त्याना बोलण्याची संधी मी देईन. कामकाज सल्लागार समितीत त्यांची संख्या बसत नसताना देखील मी त्यांना समितीत सामावून घेतले. सर्व बैठका योग्य रित्या होतील. मागील अडीच वर्षांचा तपशील बघा आम्ही रेकॉर्ड ब्रेक काम केले आहे, असं नार्वेकर म्हणाले आहेत.





