Rahul Narvekar । राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळून देखील अद्यापपर्यंत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मात्र भाजपच्या 132 जागा निवडून आल्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवल्याची माहिती आहे. तर आता गृहमंत्रिपद मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे. मात्र भाजप गृहमंत्रिपद द्यायला तयार नसल्याची माहिती आहे. या सर्व गोंधळात सरकारचा शपथविधी रखडला आहे. दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख सांगितली आहे. नव्या महायुती सरकारचा शपथविधी कधी? Rahul Narvekar । विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राहुल नार्वेकर साई दरबारी पोहचले. साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. राज्याला सक्षम सरकार मिळालं आहे. राज्याचे कल्याण होवो, अशी प्रार्थना राहुल नार्वेकरांनी साईं चरणी केली. यावेळी 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. ईव्हीएमवरून विरोधकांना टोला Rahul Narvekar । यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय घेण्यात आला. त्यावरून नार्वेकरांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधकांकडून सातत्याने रडीचा खेळ आहे. लोकसभा EVM वरच झाल्या आहेत. त्यावेळी विरोधकांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केलं. जेव्हा इच्छे विरुद्ध काही होतं तेव्हा विरोधक संबंधित संस्थेला दोषी ठरवतात. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग सर्वांवर टीका करतात. संविधानिक संस्थांवर यांचा विश्वास नाही. संविधानाबद्दल यांच्या मनात किती आदर आहे हे यातून दिसून येत आहे, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.