राहुल गांधींची परभणी भेट केवळ राजकीय हेतूने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Rahul Gandhi – परभणी शहरात 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाला. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली. यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करत मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात विधानसभेत स्पष्टीकरण दिले होते.
Maharashtra | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi visits Maharashtra’s violence-hit Parbhani and meets the family of one of the deceased, Somnath Suryavanshi.
(Source – AICC) pic.twitter.com/7JHzTOfLyk
— ANI (@ANI) December 23, 2024
दरम्यान, आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. तसेच “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली”, असा खळबळजनक आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले – मुख्यमंत्री फडणवीस
राहुल गांधी यांनी परभणी येथे दिलेल्या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यामुळे मला असे वाटते की त्यांचे जे विद्वेषाचे काम त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केले आहे. आमचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. यात सगळे समोर येईल, तसेच कुठल्याही आरोपीला सोडण्यात येणार नसल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.
Patna: On Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi’s visit to violence-hit Parbhani, Maharashtra CM Devendra Fadnavis says, “Rahul Gandhi has come here only for political purposes, this was just a political meeting, an attempt to create hatred among people on caste lines, he… pic.twitter.com/XMlxrp9hZq
— ANI (@ANI) December 23, 2024
राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्याची हत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिस तसेच मुख्यमंत्री जबाबदार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.
ते इतक्या विश्वासाने ते सांगताय, जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदार होते – सुधीर मुनगंटीवार
पराभवावर पराभव झाल्यानंतर, तसेच महाराष्ट्रात सत्तेत येण्याचे हसीन स्वप्ने बघितल्यानंतर जेव्हा एखादा नेता तोंडघाशी पडतो तेव्हा नेत्यांनी कार्यकर्त्यावर संशय घेऊ नये, नेता अपयशी आहे असा शिक्का लागू नये, म्हणुन इतक्या मोठ्या संविधानिक पदावर असणारे इतक्या सहजपणे मर्डर म्हणत आहेत. तसं काही राहुल गांधी हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पुरावाच देणार आहेत. संशय व्यक्त केला तर आपण ते समजू शकतो. मात्र ते इतक्या विश्वासाने ते सांगताय, जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदार होते आणि त्यांनी मर्डर होताना बघितला आहे.
खरं तर ईश्वरानी हा देश त्यांच्या हाती दिला नाही, सुरक्षित ठेवला या साठी देवाचे अक्षरशः आभार मानले पाहिजे. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.





