राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल; महाराष्ट्राची निवडणूक मॅच फिक्सिंगचा आराखडा: फडणवीसांनी दिले जोरदार प्रत्युत्तर म्हणाले…

Devendra Fadnavis | Rahul Gandhi | २०२४ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका या मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे, भाजपला जिथे जिथे हार पत्कारावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशी घणाघाती टीका लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर केली होती.
एका वृत्तपत्रातील लेखात मॅच फिक्सिंगसारखा घोटाळा केल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला होता. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लेखाला लेखानेच प्रत्युत्तर देईल, असे फडणवीस म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी लेखामध्ये पाच टप्प्यांमध्ये हा सर्व आराखडा मांडत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इतकेच काय तर राहुल गांधी यांनी आकडेवारीसह या गोष्टी लेखात नमूद केल्या आहेत.
राहुल गांधींचे पाच टप्प्यात विश्लेषण
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले आहे. पहिला टप्पा निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलमध्ये घोटाळा करणं, दुसरा टप्पा बनावट मतदारांचा मतदारयादीत समावेश करणं, तिसरा टप्पा मतदानाची टक्केवारी वाढवणं, चौथा टप्पा बनावट मतदान अशा ठिकाणी करून घेणं जिथं भाजपला जिंकवायचंय आणि पाचवा टप्पा पुरावे लपवणं या टप्प्यांमधूंन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याशिवाय डुप्लिकेट मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी केला आहे.
तर महाष्ट्रातील जनता माफ करणार नाही
मतदानापासून ते मतदारांच्या संख्येपर्यंत राहुल गांधी खोट्या अफवा निर्माण करण्यासाठी लोकशाही प्रक्रिया आणि संवैधानिक संस्थांबद्दल शंका निर्माण करण्यासाठी पुरावे विकृत करतात, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, लाडकी बहिणी, सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिला.
हेही वाचा: “उद्धव आणि राज ठाकरेंसह शिंदेंनीही एकत्र आले पाहिजे”; अखंड शिवसेनेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाचे आवाहन





