2014 साली झालेल्या काॅंग्रेसच्या पराभवाला राहुल गांधीच जबाबदार होते – गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी पक्ष सोडताना पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर अत्यंत परखड शब्दात टीका केली असून त्यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर पक्षाच्या अपयशाचे खापर फोडले आहे. 2014 साली झालेल्या पराभवाला राहुल गांधी हेच जबाबदार होते असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची पुढील रणनिती ठरली?
त्यांनी सोनिया गांधी यांना उद्देशून म्हटले आहे की, सन 2013 साली आपणच त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष नेमले आणि त्यांनी पक्षाची सल्लमसलत करून निर्णय घेण्याची सिस्टीमच बंद करून टाकली. सर्व अनुभवी नेत्यांना बाजुला सारून अननुभवी चाटुकारांच्या ताब्यात त्यांनी हा पक्ष दिला. राहुल गांधी यांनी युपीए सरकारचा एक अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडला होता. त्या घटनेची आठवणही आझाद यांनी करून दिली. त्यांनी म्हटले आहे की हा त्यांच्या अपरिपक्वपणाचा नमुना होता. त्यांच्या या कृतीने पंतप्रधान आणि भारत सरकारचा संपुर्ण अधिकारच नाकारला गेला. 2014 साली पक्षाचा जो पराभव झाला त्याला ही घटनाच मुख्यत्वे कारणीभूत होती असेही त्यांनी अधोरेखीत केले आहे.
भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक – शिवसेना
मात्र राहुल गांधी यांनी त्यावेळी जो अध्यादेश फाडला होता, त्या अध्यादेशाद्वारे तुरूंगात असलेल्या गुन्हेगारांना निवडणूक लढवण्याची अनमुती देण्याची तरतूद करण्यात आली होती. लालूप्रसाद यादव यांना निवडणुकीला उभे राहण्याची संधी मिळावी म्हणून काढण्यात आलेल्या या अध्यादेशाने राजकारणाच्या गुन्हेगारीकरणालाच हातभार लागला असता असे राहुल गांधी यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पक्षात सध्या रिमोट कंट्रोल मॉडेल सुरू असल्याचा आरोपही आझाद यांनी करीत राहुल गांधी यांनाच मुख्यत्वे लक्ष्य केले आहे.





