आघाडी घेण्यात राहुल गांधी ‘अव्वल’ ; पंतप्रधानांना ८७ हजारांची आघाडी तर राहुल गांधींना….

Lok Sabha Result । लोकसभा निवडणुकीचे निकाल सध्या लागत आहेत. त्यातच देशभरात अनेक ठिकाणी धक्कादायक कल समोर येत आहेत. उत्तर प्रदेश हे त्यापैकी एक राज्य आहे. देशात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या या राज्यात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी वडोदरा आणि वाराणसीमधून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघात विजयी झाल्यानंतर मोदींनी उत्तर प्रदेशसाठी वडोदरा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान, यावेळी भाजपसाठी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होतायेत. मतमोजणी सुरु असून NDA व INDIA आघाडीत अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती रंगल्या आहेत.. उत्तर प्रदेशात – समाजवादी पक्ष व काँग्रेस आघाडीने भाजपला जोरदार फाईट दिली आहे.
भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून तर व काँग्रेस नेते राहुल गांधी हे रायबरेली येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी मतांच्या बाबतीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकलं आहे.रायबरेली येथून लढणाऱ्या राहुल गांधी यांना १ लाख ७० हजार मतांचे लीड आहे. तर वाराणसी येथून निवडणूक लढवणारे मोदी जवळपास ८७ हजार मतांनी पुढे आहेत.
रायबरेली येथे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने दिनेश प्रताप सिंग यांना उमेदवारी दिली आहे. तर वाराणसी येथे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय निवडणूक लढवत आहेत.





