“जातीय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींचे, सरकारला झुकावं लागलं,” संजय राऊतांचा हल्लाबोल

पहलगाम हल्ल्याच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी गडबडीत निर्णय
“बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यासोबत पहलगाम हल्ल्यामुळे लोक आता मोदींना, शाहांना प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी गडबडीत हा निर्णय घेतला गेला आहे. कारण इतक्या वर्षांपासून आम्ही बोलत आहोत पण निर्णय घेतला गेला नाही. या देशातील बहुजन समाजासंदर्भात हा निर्णय महत्त्वाचा आहे. सरकारने, कॅबिनेटने निर्णय घेतला, त्यांचे आभारी आहोत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र…
“दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला. हिमालयाच्या मदतीला चाललाय सह्याद्री असे होर्डिंग लागेल. पण हिमालय कोण आणि सह्याद्री कोण? एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यंत्री हे महाराष्ट्राला आलेली टेंगूळ आहेत. मुख्यमंत्री टेकाड आहे आणि उपमुख्यमंत्री हे टेंगूळ आहेत, यशवंतराव चव्हाणांपर्यंत महान लोक होऊन गेले. कुठे बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, वसंतदादा पाटील आणि वसंतदादा नाईक काय लेव्हल त्यांची आणि हे अरे तुम्ही कोण ही टेंगुळ आहेत. लवकरच खाली जातील, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांसह शिंदे आणि पवारांवर निशाणा साधला. Sanjay Raut |
मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच प्रगतीपुस्तक जाहीर केलं. ट्रम्पने सुद्धा अमेरिकेत 100 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र किती कमजोर झाला, त्याची श्वेतपत्रिका काढा, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
हेही वाचा:





