“…राहुल गांधी दुसरे आंबेडकर” ; काँग्रेस नेत्याच्या विधानावर भाजपची टीका ; म्हणाले, हा दलित समुदायाचा अपमान”

Rahul Gandhi-Shehzad Poonawala । काँग्रेस नेते उदित राज यांनी राहुल गांधींबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांनी,”राहुल गांधी दुसरे आंबेडकर ठरतील” असे म्हणत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दरम्यान, उदित राज यांच्या या विधानावर भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने हा दलितांचा तसेच संविधानाचे जनक असणाऱ्या समाजसुधारकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेते उदित राज यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये,’ओबीसींना विचार करावा लागेल की इतिहास वारंवार प्रगतीची संधी देत नाही. त्यांनी तालकटोरा स्टेडियममधील परिषदेत राहुल गांधींनी जे सांगितले त्याचे अनुसरण करावे आणि समर्थन करावे. जर त्यांनी असे केले तर राहुल गांधी त्यांच्यासाठी दुसरे आंबेडकर ठरतील.’ असे म्हटले आहे.
उदित राज यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी, “काँग्रेस दुसऱ्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलत आहे, तर त्यांनी मूळ आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही.” असे म्हटले आहे. Rahul Gandhi-Shehzad Poonawala ।
तसेच पुढे बोलताना शहजादा पूनावाला यांनी, “दलितांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणे ही काँग्रेसची ओळख बनली आहे. “खऱ्या” आंबेडकरांचा अपमान कोणी केला? त्यांना भारतरत्न कोणी दिला नाही? त्यांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये कोणी लागू होऊ दिले नाही? मुस्लिम आरक्षणाबद्दल कोणी बोलले? आरक्षण वाईट आहे असे कोणी म्हटले… जवाहरलाल नेहरू.” भाजप प्रवक्ते म्हणाले, “आता ते नेहरू किंवा इंदिरा गांधी नव्हे तर दुसरे आंबेडकर बनू इच्छितात? याचा अर्थ असा की गांधी कुटुंब हे मान्य करत आहे की नेहरू आणि इंदिरा गांधी चुकीच्या मार्गावर होते… काँग्रेस फक्त एकाच कुटुंबाची पूजा करण्यावर विश्वास ठेवते.” असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
दरम्यान,राहुल गांधी म्हणाले होते की,”काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सत्तेत असताना जातीय जनगणना न करणे ही चूक होती आणि ती दुरुस्त करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत.” एका वृत्तसंस्थेनुसार, राहुल गांधी यांनी,” मी माझ्या कामाबद्दल विचार करतो, मी कुठे चांगले केले आणि कुठे कमकुवत, आणि मला दोन-तीन गोष्टी दिसतात. भूसंपादन विधेयक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, अन्नाचा अधिकार, आदिवासी विधेयक आणि नियमगिरी संघर्ष – या सर्व गोष्टी मी चांगल्या प्रकारे केल्या. आदिवासी, दलित आणि महिलांच्या प्रश्नांबद्दल बोलायचे झाले तर मला तिथे चांगले गुण मिळायला हवे होते. मी चांगले काम केले” असे त्यांनी म्हटले.
रायबरेलीच्या खासदाराने ते मान्य केले पण काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या कामात एक कमतरता होती. मी ओबीसी समुदायाचे जशी रक्षण करायला हवे होते तसे केले नाही. कारण त्यावेळी मला ओबीसींचे प्रश्न खोलवर समजले नव्हते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मला दलितांच्या अडचणी समजल्या होत्या. त्यांचे प्रश्न स्पष्ट आहेत, सहज समजतात, परंतु ओबीसींच्या समस्या लपलेल्या राहतात. जर मला त्यावेळी तुमच्या प्रश्नांबद्दल आणि समस्यांबद्दल माहिती असती तर मी त्यावेळीच जातीवर आधारित जनगणना केली असती. ही माझी चूक होती, जी मी सुधारणार आहे. ” असे देखील त्यांनी यावली म्हटले. Rahul Gandhi-Shehzad Poonawala ।





