राहुल गांधी रायडर लुकमध्ये केटीएम बाइक घेऊन पोहोचले पैंगॉंग लेकवर

लेह – कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज लेह-लडाखच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज आपल्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पैंगोंग लेकवर बाइकने निघाले. यावेळी राहुल गांधींचा वेगळाच अंदाज पाहण्यास मिळाला. राहुल गांधी हे रायडर लुकमध्ये केटीएम बाइक घेऊन पैंगॉंग लेकवर पोहोचले. राहुल गांधींचा हा व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
कॉंग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या राइडची काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत आणि “मोहब्बत का सफरनामा’ असे कॅप्शन त्याला दिले आहे. या दौऱ्यात ते पक्षाच्या नेत्यांच्या भेटीसोबतच तरुणांशी संवादही साधणार आहेत.
मोहब्बत का सफ़रनामा 🌸 pic.twitter.com/3RhepQQUch
— Congress (@INCIndia) August 19, 2023
राहुल गांधी हे त्यांच्या वडिलांना उद्या आदरांजली वाहतील. 20 ऑगस्ट 1944 या दिवशी राजीव गांधींचा जन्म झाला होता. पैंगोंग लेक ही खूप सुंदर जागा आहे, असे आपल्याला वडिलांनी सांगितले होते असेही राहुल गांधी म्हणाले. कॉंग्रेस हा दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करते.





