Rahul Gandhi – काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष अणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नारनौल येथील फॅशन डिझायनर विक्की सैनी यांच्या कारखान्यात पोहोचले. विक्की सैनी यांनी २०१६-१७ मध्ये दिल्लीतील हौज खासजवळील शाहपूर जाट येथे एक कारखाना सुरू केला होता. त्यामध्ये सुमारे ४० कारागीर देखील काम करत आहेत. आता राहुल गांधी नुकतेच त्यांच्या कारखान्यात पोहोचले आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. राहुल गांधी ओबीसी वर्गातील अशा व्यावसायिकांचे सर्वेक्षण करत आहेत, ज्यांनी आपला व्यवसाय शून्यापासून सुरू केला आहे. यावेळी राहुल गांधींनी विकी सैनीला असे विचारले की, या कामात कोणत्या प्रकारच्या समस्या येतात? यावेळी राहुल गांधींनी कपडे कापण्याचे कामही केले. जेव्हा राहुल गांधींनी विचारले की तुम्ही तुमचे काम कुठून सुरू केले तेव्हा विकी सैनी म्हणाले की, त्यांनी शून्य पातळीपासून सुरुवात केली. टीव्हीवर पाहिल्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनिंग करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राहुल गांधींनी त्यांचे ध्येय काय आहे असे विचारले तेव्हा विकीने उत्तर दिले की ‘त्यांना मध्यमवर्गीय वर्गातून वर जायचे आहे’. राहुल गांधी म्हणाले की, काम करणाऱ्या व्यक्तीला किंमत मिळत नाही आणि मध्यस्थ प्रथम फायदा घेत आहेत. ज्याला या नेटवर्कची सुविधा आहे तो त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. तुमचा एखादा ड्रेस २० हजार रुपयांना विकला जाईल, तर दुसरा कोणीतरी तो पाच लाख रुपयांना विकत असेल. कौशल्यात काही फरक नाही, पण दुसराच कोणीतरी सगळा नफा घेत आहे. असं राहुल गांधी म्हणाले.