Rahul Gandhi : निवडणूक विजयासाठी राहुल गांधी केदारनाथ चरणी लीन
Updated On:

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसीय उत्तराखंड दौऱ्यावर असून, आज रविवारी (5 नोव्हेंबर) केदारनाथ (kedarnath) धामला पोहोचले आहेत.
पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी ते येथे रुद्राभिषेक करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. उत्तराखंड काँग्रेसने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. यापूर्वी 2015 मध्ये राहुल गांधी पायीच केदारनाथ धामला पोहोचले होते.
केदारनाथ (kedarnath) धामला पोहोचल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि मंदिराच्या महंत पुजाऱ्यांची भेट घेतली. तसेच, बाबा केदारनाथचे देखील दर्शन घेतलं आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्यात माजी प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल देखील उपस्थित राहणार आहेत.





