‘ही तर क्रूरता …’ ; भटक्या कुत्र्यांवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Rahul Gandhi on Supreme Court। सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी कडक काल सूचना जारी केल्या. न्यायालयाने दिल्ली-एनसीआरला या कुत्र्यांना तात्काळ पकडून त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना कायमचे शेल्टर होममध्ये ठेवण्यास सांगितले. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, “दिल्ली-एनसीआरमधून सर्व भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश म्हणजे मानवता आणि विज्ञानावर आधारित दशकांपूर्वीच्या धोरणापासून मागे हटण्यासारखे आहे. हे मूक प्राणी ही अशी समस्या नाही जी दूर करता येईल.” असे म्हटले आहे.
The SC’s directive to remove all stray dogs from Delhi-NCR is a step back from decades of humane, science-backed policy.
These voiceless souls are not “problems” to be erased.
Shelters, sterilisation, vaccination & community care can keep streets safe – without cruelty.Blanket…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 12, 2025
पुढे ते म्हणाले की, “केवळ निवारा, नसबंदी, लसीकरण आणि सामुदायिक काळजीच रस्ते सुरक्षित ठेवू शकते आणि तेही कोणत्याही क्रूरतेशिवाय. परंतु अचानक कुत्र्यांना एकत्रितपणे काढून टाकण्याचे पाऊल क्रूर, अदूरदर्शी आणि करुणेच्या पलीकडे आहे. आपण एकत्रितपणे सार्वजनिक सुरक्षा आणि प्राणी कल्याण सुनिश्चित करू शकतो. ” असे म्हटले.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी भटक्या कुत्र्यांच्या धोक्याची स्वतःहून दखल घेतली होती. Rahul Gandhi on Supreme Court।





