Dehugaon : मतदारयादी पुनरीक्षणासाठी २९ जुलैपर्यंत विशेष मोहीम
Dehugaon : देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांचे आवाहन

Dehugaon : मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देऊन इन्युमरेशन फॉर्मचे वितरण आणि संकलन करत आहेत.
प्रत्येक नोंदणीकृत मतदाराने स्वतंत्रपणे फॉर्म भरून नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदी माहिती अचूक नमूद करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची पडताळणीही केली जाणार असून, फॉर्म न भरल्यास मतदार पडताळणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊन पुढील कायदेशीर कारवाईची शक्यता आहे.
यावेळी बीएलओ घरी भेट देतील. याशिवाय मतदार सेवा पोर्टल आणि वोटर हेल्पलाइन मोबाईल ॲपद्वारेही ऑनलाइन फॉर्म भरता येणार आहे. प्रत्येक मतदाराने वेळेत फॉर्म भरून मतदारयादी अद्ययावत करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी केले आहे.
Leopard Poaching: वन विभागाची मोठी कारवाई! बिबट्याची कातडी आणि नखे विकताना दोघे रंगेहाथ अटक





