‘देवाने मोदींना अंबानी-अदानींच्या मदतीसाठी पाठवले’ ; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Rahul Gandhi on Modi । लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचारात राजकीय पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींच्या देवाबद्दलच्या वक्तव्यावर पलटवार करत, इतर सर्व लोक जैविक आहेत पण पीएम मोदी जैविक नाहीत.” असे त्यांनी म्हटले.
अदानींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करा Rahul Gandhi on Modi ।
राहुल गांधी यांनी पंतप्रधानाविषयी बोलताना, “पंतप्रधान मोदींच्या देवाने त्यांना अंबानी आणि अदानींच्या मदतीसाठी पाठवले आहे म्हणजे अदानींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करा आणि रेल्वेला द्या, .असा खोचक टोला लगावला. पण देवाने त्याला शेतकरी आणि मजुरांच्या मदतीसाठी पाठवलेले नाही. जर देवाने त्याला पाठवले असते तर त्याने गरीब आणि शेतकऱ्यांना मदत केली असती. हे किती दिव्य आहे? हा पंतप्रधान मोदींचा देव आहे.असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
काय म्हणाले पीएम मोदी? Rahul Gandhi on Modi ।
पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “जेव्हा माझी आई जिवंत होती, तेव्हा मला असे वाटले की मी जैविक दृष्ट्या जन्मलो आणि तिच्या मृत्यूनंतर जेव्हा मी माझे अनुभव पाहतो तेव्हा मला खात्री पटते की मला देवाने पाठवले आहे. ही शक्ती माझ्या शरीरातून नाही. देवाने मला हे दिले आहे. म्हणून देवाने मला तसे करण्याची क्षमता, शक्ती, शुद्ध हृदय आणि प्रेरणा दिली आहे. मी काही नसून देवाने पाठवलेले साधन आहे. एक दैवी मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांना येथे पाठवण्यात आले आहे, “असे पंतप्रधान म्हणाले होते.
दरम्यान, गिरीराज सिंह, कंगना राणौत असे अनेक भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना देवाचा अवतार म्हणत आहेत. अलीकडेच, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि ओडिशातून निवडणूक लढवत असलेल्या संबित पात्रा यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. भगवान जगन्नाथ हे मोदींचे भक्त असल्याचे ते म्हणाले होते.





