‘तिचा मृत्यू हा भाजपच्या व्यवस्थेने केलेला थेट खून…’ ; बालासोरमध्ये विद्यार्थिनीच्या आत्मदहनानंतर राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi on Balasore case। ओडिशामधील बालासोरमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने लैंगिक छळाला कंटाळून आत्मदहन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, तिच्या मृत्यूने सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला घेरले आहे.
बालासोर घटनेबद्दल राहुल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सरकारला घेरले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, “ओडिशात न्यायासाठी लढणाऱ्या मुलीचा मृत्यू हा भाजप व्यवस्थेने केलेला थेट खून आहे. त्या धाडसी विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला – पण न्यायाऐवजी तिला वारंवार धमकावले गेले, त्रास दिला गेला, अपमानित केले गेले. ज्यांना तिचे रक्षण करायचे होते, तेच तिला ओरबाडत राहिले.” असे म्हणत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
ओडिशा में इंसाफ़ के लिए लड़ती एक बेटी की मौत, सीधे-सीधे BJP के सिस्टम द्वारा की गई हत्या है।
उस बहादुर छात्रा ने यौन शोषण के ख़िलाफ़ आवाज़ उठाई – लेकिन न्याय देने के बजाय, उसे धमकाया गया, प्रताड़ित किया गया, बार-बार अपमानित किया गया।
जिन्हें उसकी रक्षा करनी थी, वही उसे तोड़ते…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 15, 2025
विद्यार्थीनीच्या मृत्यूवर राहुल गांधींनी भाजपला घेरले Rahul Gandhi on Balasore case।
राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये पुढे, “प्रत्येक वेळीप्रमाणे, भाजप व्यवस्था आरोपींना संरक्षण देत राहिली – आणि एका निष्पाप मुलीला स्वतःला पेटवून घेण्यास भाग पाडले. ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने घडवलेला खून आहे. मोदीजी, ओडिशा असो किंवा मणिपूर, देशातील मुली जळत आहेत, तुटत आहेत आणि मरत आहेत. आणि तुम्ही? तिथे शांत बसून आहात. देशाला उत्तरे हवी आहेत, तुमचे मौन नाही. भारताच्या मुलींना सुरक्षा आणि न्याय हवा आहे.” असे देखील म्हटले आहे.
दरम्यान ,बालासोर जिल्ह्यातील फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमधील एका विद्यार्थिनीने लैंगिक छळाला कंटाळून आत्मदहन केले आहे. २० वर्षीय बी.एड.च्या विद्यार्थिनीला उपचारासाठी एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु ९० टक्के भाजल्यामुळे तिची मृत्यूशी झुंज अखेर संपली. आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापूर्वी, विद्यार्थिनीने बी.एड.चे प्राध्यापक समीर कुमार साहू यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत कारवाईची मागणी करत कॉलेज कॅम्पसजवळ धरणे आंदोलन केले होते. Rahul Gandhi on Balasore case।





