राहुल गांधींची शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबीयांशी भावनिक भेट ; सदस्यांचे केले सांत्वन

Rahul Gandhi meets Narwhal family । लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. याठिकाणी त्यांनी दिवंगत विनय यांच्या पत्नी हिमांशी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी राहुल गांधींसोबत हरियाणा काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. यापूर्वी, राहुल शुभम द्विवेदीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी कानपूरला गेले होते.
या अगोदर, विनय नरवाल यांच्या २७ व्या जयंतीनिमित्त कर्नालमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांची पत्नी हिमांशी म्हणाली की, मला कोणाविरुद्ध द्वेष नको आहे. आम्हाला लोकांनी मुस्लिम किंवा काश्मिरी लोकांविरुद्ध द्वेष पसरवावा असे वाटत नाही. आम्हाला शांती आणि फक्त शांती हवी आहे. Rahul Gandhi meets Narwhal family ।
#WATCH | Karnal, Haryana | Congress MP & LoP Lok Sabha Rahul Gandhi arrives at the residence of Indian Navy Lieutenant Vinay Narwal, who lost his life in the Pahalgam terror attack pic.twitter.com/Jp0ttMA51s
— ANI (@ANI) May 6, 2025
हिमांशु यांनी यावेळी, “आम्हाला न्याय हवा आहे. ज्यांनी त्याच्याशी अन्याय केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. रक्तदान शिबिरातील विविध वक्त्यांनी सांगितले की, दिवंगत अधिकाऱ्याने त्यांच्या सेवेदरम्यान अत्यंत निष्ठेने देशाची सेवा केली आणि ते नेहमीच सर्वांच्या हृदयात जिवंत राहतील.” अशी प्रतिक्रिया दिली.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता, ज्यात भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही समावेश होता.





