Rahul Gandhi | ‘लोकसभेतील विरोध पक्ष नेतेपद राहुल गांधींनी स्वीकारावे’; काँग्रेस नेत्यांची मागणी

Rahul Gandhi | Leader of Opposition | Lok Sabha Election 2024 – राहुल गांधी यांनीच आता लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी स्वीकारावी अशी जाहीर मागणी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी केली आहे.
या पदासाठी ते एकदम रास्त व्यक्ती आहेत, ते देशातल्या १४० कोटी जनतेचा आवाज आहेत आणि त्यातून पक्षालाही बळकटीमिळेल असा दावा कॉंग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा यांनी केला आहे.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग, जे लुधियानामधून निवडून आलेले खासदार आहेत, म्हणाले की अंतिम निर्णय पक्षाच्या नेतृत्वावर अवलंबून आहे आणि ही भूमिका घ्यायची की नाही हे राहुल गांधी यांना ठरवायचे आहे पण त्यांनी ही भूमिका स्वीकारावी अशी अनेक कॉंग्रेस जनांची मागणी आहे.
ममोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ नये कारण त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपला लोकांनी बहुमत नाकारले आहे, मी जर त्यांच्या जागी असतो तर हे पद स्वीकारले नसते असे अमरिंदर सिंग राजा वारिंग म्हणाले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीही राहुल गांधी यांनीच लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करावे अशी मागणी करताना ही देशातल्या १४० कोटी जनतेची इच्छा असल्याचे म्हटले आहे.
गुरदासपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकलेले काँग्रेस खासदार सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले की, राहुल गांधी हे असे नेते आहेत जे संसदेत पंतप्रधानांना उत्तर देऊ शकतात म्हणून त्यांनी एलओपीचे पद स्वीकारले पाहिजे.





